Type Here to Get Search Results !

माढा |कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे बंधूंची एक हाती सत्ता प्रस्थापित



कुर्डुवाडीची चावी राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंकडेच !


माढा तालुक्यातील कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी महाविकास आघाडीने सर्व सतरा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. शिवसेनेचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत आणि माढा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकही जागा जिंकता आलेली नाही. 

आमदार शिंदे बंधूंच्या नेतृत्वाखालील कुर्डुवाडी बाजार समितीतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेचे प्राचार्य श्री.शिवाजीराव सावंत आणि माढा लोकसभा शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेल मैदानात उतरला होता. मात्र, शिंदे बंधूंनी एकहाती बाजार समिती जिंकत,पुन्हा सत्ता काबीज केली. आमदार बबन दादा व आमदार संजय मामा शिंदे बंधूंच्या गटाची १ जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad