मोखाडा आसे येथे शेतात आग लागल्याने प्रंचड नुकसान
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेली आसे ग्रामपंचायत मधील भाऊ भोईर यांच्या भाताचे उडवे मळणी करून ठेवलेला पेंढा तसेच शेतामध्ये काजू ,आंबा यांना आज दुपारी १,२ वाजता दरम्यान वणवा आल्याने शेतात अचानक आग लागल्याने ते पूर्ण जळून त्याची खाक झाली आहे.
मोखाडा तालुका हा पूर्णपणे डोंगराळ भाग असून येथील शेतकरी हे पूर्णपणे त्यांच्या शेतीवर अवलंबून असतात आणि या ठिकाणी झाडी डोंगर असल्याने पावसाळा मध्ये भरपूर पाऊस पडतो त्यामुळे या भागात फक्त सहामाही शेतीची लागवड केली जाते .नंतर भात लागवडी नंतर पूर्णपणे कोरडे पडल्याने येथील शेतकरी पूर्ण शेत मोकळं सोडत असतात त्याच प्रमाणे शेतकरी भाऊ भोईर याने सुद्धा भाताचे उडवे मळणी करून ठेवलेला पेंढा काजू ,आंबा यांच्या बागला आग लागून त्याच प्रचंड नुकसान झालं आहे असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी श्री प्रदीप वाघ यांनी केली आहे.
श्री भाऊ भोईर यांच्या शेतात भाताचे उडवे मळणी करून ठेवलेला पेंढा तसेच काजु, आंबे ची बाग पुर्ण पणे जळुन भस्मसात झाली आहे.
याबद्दल माहिती मिळताच श्री प्रदीप वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली असून या बाबत माहिती नायब तहसिलदार श्री ठाकरे यांना दिली तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील दुरध्वनी वरुन दिली असून महसुल विभागाने तातडीने पंचनामा केला आहे.