अक्कलकुवा तालुक्यातील व मोलगी परिसरातील पिंपळखुंटा (सोंगाआंबा) येथे भूमीसुपोषण कार्यक्रम संपन्न झाला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ता पासून सुरू झालेल्या भूमीसुपोषणाचा कार्यक्रम हा मोलगी परिसर सेवा समिती व रिड्स यांच्या माध्यमातून घेण्यात आला.
शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या मातीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन होणारी जमिनीची धूप थांबविण्यासाठी त्याने सातत्याने नैसर्गिकरित्या उपाययोजना करणे,नैसर्गिक संसाधनांची जपणूक करणे.मातीचे,शेतीचे आणि पाण्याचे महत्व पटवून देणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात शेतकरी आपल्या शेतीतील माती घेऊन येतात व त्या मातीवर कलश ठेवून त्या मातीची आरती करून पूजा करणात येते.की आमच्या आरोग्य सोबतच या मातीचे आरोग्य चांगले राहून या जमिनीतून चांगली ऊपज होवून त्याची भरभराट होवोत.या कार्यक्रमातुन शेतकरी संकल्प करतात की आम्ही या मातीच्या सुपोषणासाठी प्रयत्न करणार,शेतात कमीतकमी रासायनिक खतांचा वापर करणार,शेतात शेण खत व गांडूळ खत तयार करून त्याचा वापरावर भर देणार,माती सरंक्षणासाठी सामूहिक श्रमदानातून दगडी बांध,सी,सी,टी या सारखी कामे करून घेण्याचा संकल्प करतात.
मोलगी परिसर सेवा समितीने परिसरातील मालपाडा,साकलीउमर,भगदरी मोजापाडा,मोलगी,जुनवाणी,अशा अनेक गावांत हे अभियान राबविले जात असून भूमीसुपोषणा अभियानाच्या माध्यमातून माती विषयी जनजागृती करण्यात येत आहे.
सोंगाआंबा येथील उपस्थित शेतकरी बांधवांना बदलणाऱ्या पृथ्वीवरील व वातावरणातील बदलामुळे होणारे मानवी जीवनावरील दूरगामी परिणाम,आधीचे जीवनमान आणि आताचे जीवनमान यातील बदल,जमिनीची झालेली धूप,वृक्षतोड त्याचे परिणाम यावर मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे तसेच मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी यांनीही केले.
यावेळी सोंगाआंबा दशरथ वसावे,कालशा वसावे,पारशी,वसावे दमन्या वसावे,सामा वसावे,वनसिंग वसावे, दिल्या वसावे,कागड्या वसावे,चमाऱ्या राऊत,नोबल्या वसावे,माकत्या वसावे,रूल्या वसावे,मोना वळवी,किसन तडवी, कलुसिंग वसावे,दिलीप वसावे,परशुराम राऊत,इंदिरा वसावे,कालुबाई वसावे,आमसी बाई वसावे,कालुबाई वसावे,सनदाबाई वसावे,बोंडीबाई वसावे,लक्ष्मी वसावे,आदि उपस्थित होते.