वन अतिक्रमण धारकांनी सबळ पुरावे सादर केले असताना वेळोवेळी पुराव्याची मागणी प्रांतधिकाऱ्यांना निवेदन
अक्कलकुवा तालुख्यातील वन अतिक्रमण धारकांनी सबळ पुरावे सादर केले असताना वेळोवेळी पुराव्याची मागणी करण्यात येते ही अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी भाजपा अनु: जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी तळोदा उप विभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदनात केली आहे
या बाबत निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील वन अतिक्रमण धारकांना आपण नोटीसी द्वारे १३/१२/२००५ पूर्वीचे अतिक्रमण संदर्भातील सबळ पुराव्यांची मागणी केली आहे विशेष म्हणजे सदर वन जमिनी सदरील शेतकरी गेल्या ३० ते ३५ वर्षा पासून शेती करत असून अद्याप हि जमीन त्याचे नावे न करता वेळोवेळी पुरावांची मागणी केली जात आहे सदर जमीन हि त्यांच्या ताब्यात असून पुढेही त्यांचा ताब्यात राहील.
तरी सदर नियम शिथिल करून या वनअतिक्रमण धारकांना जमिनी ताब्यात द्यावेत अशी मागणी निवेदनात भाजपा अनु. जमाती प्रदेश उपाध्यक्ष नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी केली आहे.