कै. कलावंती फाऊंडेशन सोमावल तर्फे आयोजित आमदार राजेश दादा जिल्हास्तरीय मॅरेथॉन
तळोदा:- जागतिक महिला दिनानिमित्त कै. कलावंती फाऊंडेशन सोमावल तर्फे आयोजित राजेश दादा जिल्हास्तरीय मॅरेथॉन( महिला) ५ किमी स्पर्धेला आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. मरेथॉन स्पर्धा आप श्री संत गुलाम महाराज प्रवेश द्वार येथून सुरू झाली.
याप्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनागरध्यक्षा भाग्यश्री चौधरी, रासीलाबेन देसाई, संगीता नाईक, नीलाबेन मेहता, आबाबेन सोनगडवाला, शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी नगरसेवक गौरव वाणी, श्याम राजपूत, नारायण ठाकरे, शिरीष माळी, प्रदीप शेंडे, पोलीस उपनिरीक्षक अमित बागुल, सेवानिवृत्त सप्रअ अशोक तांबोळी, परिभाई चौकशी, गुड्डू वळवी, प्रवीण वळवी, विठ्ठल बागले, भरत पवार, उपस्थित होते. स्पर्धेत
२५० महिलांनी सहभाग नोंदवला
प्रथम पारितोषिक आरती पावरा ( उमराणी) हिने मिळवला असून तिला ११ हजार व गोल्ड मेडल, द्वितीय पारितोषिक शकिला वसावे (धडगाव) ७ हजार व सिल्वर मेडल, तृतीय पारितोषिक महेक वसावे (जळखे) ५ हजार व कांस्य पदक उतेजनार्थ योगिता वळवी स्पोर्ट्स शूज देण्यात आले तर पाचवे क्र. सविता पावरा हिने मिळवला असून तिला संगीता नाईक यांच्या कडून स्पोर्ट्स शूज देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून प्रमाणपत्र व टी शर्ट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सुर्यवंशी यांनी केले. यशस्वीतेसाठी श्री गोऱ्या हनुमान ग्रुप चे अमन जोहरी व सदस्य तसेच किरण सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.