अभ्यासाबरोबरच व्यायाम ही महत्त्वाचा - स्वच्छतादूत राजीव तिडके
लोहा शिवाजी मुंडे
प्रजासत्ताक दिनानिमित्त खेळांच्या विविध स्पर्धेचे आयोजन पायोनिअर्स कोचिंग क्लासेसने आयोजित केले होते. त्याच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष पदावरून स्वच्छतादूत राजीव तिडके यांनी अभ्यासाबरोबरचे व्यायामाचे महत्व आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलींद धनसडे, डॉ. गाडेकर, डॉ. दळवी, नगरपालिकेचे जगदान दाम्पत्य, पालक प्रतिनिधी म्हणून मंगल सोनकांबळे सर, कोटलवार सावकार, ओमकार बोधनकर सर, देविदास बालाघाटे, ॲड. मोटरवार, गणपत बोथीकर, अनिल कदम, सुनील राऊत इ.
प्रारंभी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय शाळेचे संस्थापक समीर शेख यांनी करून दिला. डॉ. धनसडे यांनी आपल्या भाषणात रात्रीनंतर दिवस उगवतो तसेच दुःखानंतर सुख येते अशा आशायीय कविता सादर केली.
अध्यक्षीय भाषणात राजीव तिडके यांनी आजपर्यंत जी सामाजिक कामे करता आली ती केवळ विद्यार्थ्यामुळेच असे सांगितले. ते म्हणाले, "माझ्या पुस्तकाच्या आशयानुसार केंद्र सरकारने जी. आर. काढला, परवाच मराठा सेवा संघाचे प्रमुख मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनीअभिनंदन केले. सुप्रीम कोर्टानेही सामाजिक कार्याची दखल घेतली. सगळीकडे अभिनंदन होत असतानाही स्वतःच्या तब्यीयतेचे दुःख वाटतेच कारण अभ्यास करण्याच्या काळात 12-12 तास अभ्यास करायचो आणि कांही काळ व्यायामाला सुट्टी दिली त्याचे परिणाम भोगत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायाम करत राहिल्यास भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल असे मन व्यक्त केले.
या वेळी विदयार्थ्यांचा प्रमाण पत्र, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला
आभार प्रदर्शन समीर शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकवृंदानी परिश्रम केले.