Type Here to Get Search Results !

पयुवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर



पयुवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर


             नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी साहित्यिक, आदिवासी एकता परिषद व विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते आप. संतोष पावरा यांना नुकताच दिवंगत व्यंकटेश आत्राम ' राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.




             हा, राजस्तरिय साहित्य गौरव पुरस्कार कवी संतोष पावरा यांचा ' ढोल ' कविता संग्रहाला मिळाला आहे. २०१७ साली प्रकाशित झालेल्या या कविता संग्रहात १७, कविता पावरी मातृभाषेत ३१ मराठी आणि ४ हिंदी भाषेत असे एकूण ५२ कवितांचा हा कविता संग्रह महाराष्ट्र भर परिचित आहे. या कविता संग्रहाला डॉ. तुकाराम रोंगटे, मराठी विभाप्रमुख पुणे विद्यापीठ यांची प्रस्तावना लाभली आहे. तर या संग्रहातील १० आदिवासी पावरी बोलीभाषेतील कविता भारत सरकार साहित्य अकादमी दिल्लीचे, क्षेत्रीय कार्यालय मुंबई मार्फत "आदिम भाषा' पुस्तकात प्रकाशित झाल्या आहेत. 




             ढोल कविता संग्रहाला, पडकी फाऊंडेशन च्या वतीने २०१७ चा 'डॉ गोविंद गारे आदिवासी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार', आदिवासी साहित्य अकादमी महाराष्ट्र तर्फे 'आप.प्रतापभाऊ गायकवाड राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' तर २०२१ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुणे येथे 'राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते. आणि नुकतेच जाहिर झालेला दिंवगत व्यंकटेश आत्राम ' राज्यस्तरीय साहित्य गौरव' पुरस्कारामुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लवकरच हा पुरस्कार वर्धा येथे एका मोठ्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौविण्यात येणार असल्याचे माहिती आयोजकांनी सांगितले आहे.




"माझ्या ढोल कविता संग्रहाला सुरुवाती पासूनच वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. तसेच मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थामधील वाचक देखील ढोल संग्रहाचे वाच्काहे, त्यामुळे तिसऱ्या आवृत्तीत इतर राज्यातील वाचकांचे अभिप्राय देखील मांडले आहे. या पुरस्कारामुळे मला पुढील साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा मिळत राहणार आहे. पुरस्काराच्या रूपाने माझ्यावर साहित्य निर्मितीची जबाबदारी दिली आहे असे मी समजतो. आणि ती जबाबारी योग्य तऱ्हेने पार पाडण्यासाठी मी नक्कीच मेहनत घेत राहील युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad