Type Here to Get Search Results !

प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन वेंगुर्लात


प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन वेंगुर्लात

नंदुरबार, ता. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे महाअधिवेशन १५ व १६ फेब्रुवारीला वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्य नेते आबा शिंपी यांनी दिली. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष शिक्षणमंत्री दीपक केसरकर असून राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षक व त्यांच्या समस्या, 
शासनाचे नवीन

प्राथमिक शिक्षक समिती राज्य महाराष्ट्र शाखा -

धोरण याबाबत अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. यासाठी शिक्षण परिषद आयोजित केली असून तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार असून राज्य व राष्ट्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, शिक्षण सेवक मानधन वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, या अधिवेशनात शिक्षकांना मुख्यालय सक्ती रद्द करावी. व मुख्यालयाच्या नावाखाली घरभाडे भत्ता बंद करण्याचा प्रकार थांबवावा, शिक्षक बदली धोरणात आवश्यक

ते बदल करावेत. पोषण आहार स्वयंपाकी मानधन वाढवावे. यासह इतर अनेक मागण्या प्रामुख्याने मांडल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

यावेळी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित मागण्यांबाबत आवाज उठवला जाणार आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी जिल्ह्यातून हजारो शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नंदुरबार नेहरू बिजेसिंग नाईक, सरचिटणीस शांतीलाल अहिरे , जिल्हा नेते मधुकर कापुरे , हेमंत ठाकरे, मनिलाल नावडे, जगदेव वळवी , शामुदेव गावित ,दर्पण भांबरे, रामलाल पारधी, रामु वळवी, पाशा ठाकरे, शिवाजी जमदरे , विलास वळवी, पी.सी.वळवी, तुषार वळवी, अमित पाडवी, 
धडगाव तालुका रामचंद्र पटले, आपसिंग वसावे , विजय पराडके बाबूलाल तडवी जंगलसिंग पाडवी , हरिश्चंद्र पाडवी 
नवापूर
सुनील नहिरे , अविनाश मावची, प्रशांत वसावे ,शंकर वळवी, नारायण गावित ,प्रकाश गावित, शैलेश गावित, अर्चना पाडवी, राबीन पाडवी
तळोदा
  समाधान घाडगे ,प्रदीप पडोळ, रमेश कोठारी, नितीन महाजन, सोन्या पाडवी, दादा टुले ,प्रवीण जाधव ,अनिल करांडे, रवींद्र चौधरी मुजम्मिल अन्सारी,
नंदुरबार
 राजू मावची , मगन गवळी, गेबन्या वसावे , विष्णू गावित, रघुनाथ चौरे ,
अक्कलकुवा
बहादुरसिंग वळवी, किरण वळवी, शेगजी वळवी, यशवंत वळवी, कांतीलाल पाडवी, महेंद्र वसावे, दिलबरसिंग वसावे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad