तालुकास्तरावरील पदाधिकारी , अधिकारी व कर्मचारी यांच्या पालघर येथे क्रीडा स्पर्धा संपन्न
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ दिंनाक १० फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल मैदान दांडेकर कॉलेज पालघर येथे दोन दिवस संपन्न झाले आहेत.
या ठिकाणी जव्हार मोखाडा, वाडा,विक्रमगड,डहाणू, तलासरी,वसई ,पालघर,या तालुक्यातील सर्व विजेता पदाधिकारी , अधिकारी व कर्मचारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धासाठी दांडेकर कॉलेज मैदानावरील उपस्थित राहून आपल्या अंगी असलेले गुण ,कौशल्य,चिकाटी दाखवले.या मध्ये खो खो ,कबड्डी ,संगीत खुर्ची रिले असे वेगवेगळे खेळांचे नियोजन करून खो खो स्पर्धेत ( पुरुष ) जव्हार आणि डहाणू यांचे मध्ये अंतिम सामना झाला असून या मध्ये जव्हार या संघाने बाजी मारून खो खो ( महिला) दुसरा क्रमांक व १०० मिटर धावणे ( पुरुष ) प्रथक क्रमांक नंतर १०० मिटर ४ रिले ( पुरुष व महिला) दुसरा क्रमांक पटकावून जव्हार तालुक्यातील लौकिकाला साजेसा खेळ केला आहे