Type Here to Get Search Results !

क.ब. चौ. उ. म. वी. संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्याल मोलगी रा से यो हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे जी. प. प्राथमिक शाळा उखली येथे उद्घघाटन संपन्न



क.ब. चौ. उ. म. वी. संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्याल मोलगी रा से यो हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे जी. प. प्राथमिक शाळा उखली येथे उद्घघाटन संपन्न



क ब चौ उ म वी संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोलगी ता अक्कलकुवा महाविद्यालयाच्या रा से यो विभागाचे हिवाळी श्रम संस्कार शिबीर उखलि पाडा येथे दि 28 जाने ते 3 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे.या शिबिराचे उदघाटन निवृत्त सेना जवान फकिरा पाडवी यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे सीनेट सदस्य श्री रामसिंग वळवी ॲड सरदार सिंग वसावे, शीतलताई पाडवी, प्रतापसिंग वसावे हे होते तर अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ पुष्पा गावित होते.कार्यक्रमाची सुरुवात श्रमाचे प्रतीक म्हणून पावडी व टॅगरीचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या. उदघटन पर मनोगतात फकिरा पाडवी यानी या योजनेद्वारे सर्व सामान्यांच्या मनात देशभक्ती पेरण्याचे मोठे काम होते ती देशभक्तीची भावना आयुष्यभर जपण्याचे आवाहन केले. स्वयंसेविकानी या शिबिरा दरम्यान गावात प्रत्येक घरात शासकीय योजना बाबत जागरूकता करण्याचे आवाहन करून शिवारात होण्याच्या प्रकल्पात सक्रिय होण्याचे आग्रही प्रतिपादन केले. श्री रामसिंग वळवी यांनी युवा म्हणजे संकल्प पूर्ती करणारे ऊर्जा स्त्रोत आहे जर ही युवा शक्ती विधायक कामात जुंपली तर नवभारत निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या शिबिरात युवकांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पुष्पा गावित यांनी आपल्या महाविद्यालय काळातील रा से यो विभागात स्वयंसेवीका म्हणून केलेल्या कामाना उजाळा देत अशा शिबिरामध्ये व्यक्तिमत्व विकासात मदत झाली. या शिबिरात संस्कारची शिदोरी मिळेल ती आपल्याला आयुष्यभर पुरेल म्हणून येथील सर्व प्रकल्पात मनापासून सेवा करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सीताराम जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र तींगोटे यांनी केले. या प्रसंगी रा से यो स्वांसेवक, स्वयंसेविका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad