जव्हार तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनकआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी.
जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर -
जव्हार तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार बांधवाचा सत्कार.
जव्हार तालुका पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी हा मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्ताने आज शासकीय विश्रामगृह जव्हार येथे त्याच्या प्रतिमेला डॉ. रामदास मराड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवर पतंगशाह कुटीर रुग्णालय जव्हारचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांचे जेष्ठ पत्रकार संदीप साळवे यांच्या हस्ते स्वागत केले.
त्यानंतर उपस्थित सर्व जव्हार तालुक्यातील शहरी व ग्रामीण पत्रकार बांधव यांना पुष्प देऊन राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी जव्हार पत्रकार संघाचे सदस्य व पत्रकार ऍड. पारस सहाणे यांनी वकील पदवी प्राप्त केल्याबद्दल व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मनोज कामडी यांची ग्रामपंचायत शिरोशी सदस्य व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र शाखा पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जव्हार तालूका पत्रकार संघाच्या वतीने डॉ. रामदास मराड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर यांनी ६ जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिन याविषयी मार्गदर्शन करतांना डॉ. मराड यांनी सर्व पत्रकार बांधवाना शुभेच्छा दिल्या व पूर्वीची पत्रकारिता व सध्याच्या काळातील पत्रकारिता याविषयी त्याचे अनुभव सांगितले व सध्या सर्व चालू घडामोडी आपले पत्रकार बांधव वृत्तपत्र मध्ये बातमी देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत सांगितले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर ऍड. पारस सहाणे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती देताना ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो.
१९६४ पासून दरवर्षी ६ जानेवारी रोजी हा दिन जन्म दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. त्याचा जन्मदिवस हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.