Type Here to Get Search Results !

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूमीसेना आदिवासी एकता परिषदेचा भव्य मोर्चा !



पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूमीसेना आदिवासी एकता परिषदेचा भव्य मोर्चा !


  मुरबाड दि.३१ प्रतिनिधी  लक्ष्मण पवार  




    पालघर जिल्ह्यातील आदिवासी , गोरगरीब , भूमिपुत्र , शेतमजूर , यांच्यावर होणार्या अन्यायाबाबत नुकताच भूमीसेना आदिवासी एकता परिषद च्या वतीने क्रांतिवीर बिरसामुंडा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता सदर मोच्यामधे , १ ) सरकारी जागेवर राहणारे , आदिवासी , गोरगरीब , भूमिपुत्र , शेतमजूर , यांना तहसिलदार यांच्या कडून दिल्या जाण्यार्या घरे तोडण्याच्या नोटिसा त्वरीत मागे घेण्यात याव्यात व त्यांची राहती घरे व घराखालील जागा त्वरीत नियमाकुल करण्यात यावी २ ) सरकारी , गायरान , गुरचरण , जमिनिवर व्यापारासाठी केलेली अतिक्रमणे ( व्यापारी गाळे , चाळी , रिसार्ट , कोळंबी प्रकल्प ) इत्यादीवर त्वरीत तोडक कार्यवाही करून ती अतिक्रमणे हटवा व त्याच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करा ३ ) खोटे जातीचे दाखले घेऊन आदिवासी आरक्षण व नोकर्या बलकावणार्या बोगस आदिवासीना त्वरीत कामावरून काढून त्याच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करा व पेसा कायद्या अतंर्गत नोकर भरती करा ४ ) आदिवासी जमातीच्या आक्षणात इतर समुहाना घुसवू नये व आदिवासी जमातीचे संरक्षण करा ५ ) भूमिपुत्राना उधवस्त व विस्थापित करणारे विणाषकारी प्रकल्प ( वाढवण बंदर , बुलेट ट्रेन , सागरी महामार्ग , शिपिंग कँरिडोर रेल्वे मार्ग ) रद्द करा ६ ) आदिवासी अनुसुचित क्षेत्रातील संविधानिक तरतूदीचे उल्लघन करणे बंद करा संविधानाचे पालन करा ७ ) शेती , मासेमारी , लघुउद्योग , वनउपज , शेतमजुरी , मोलमजुरी , व ग्रांमीन उद्योगाना संरक्षण द्या इत्यादी मागण्या सदर मोर्चाच्या वेळी माडण्यात आल्या




यावेळी जिल्हाधिकारी पालघर येथे सदर मोर्चाच्यावेळी , भूमीसेना , आदिवासी एकता परिषदचे संस्थापक काळूराम ( काका ) धोदडे , पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता करबट , वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे , बोईसर विधान परिषदचे आमदार राजेश पाटील ,भूमीसेनेचे शशी सोनावणे , जव्हार तालुका कार्यकरत्या भावना पवार , कार्यकरते मनोज दांडेकर , रूपजी कोल्हा , बिरसा फायटर संघटनेचे राजाभाऊ सरनोबत , आदिवासी संघर्ष मोर्चाचे प्रभाकर शेलार , जयस संघटना पालघर चे जगन्नाथ वरठा , वाढवण बंदर प्रतिनिधी केदार नाईक , इत्यादीनी सदर मोर्चाच्या वेळी आपले विचार मांडले तसेच अश्विनी ठाकरे यांनी गित सादर केले यावेळी जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली सदर मोर्चाचे सुत्रसंचालन निता काटकर यांनी केले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad