म्हसोबाच्या अडीजशे वर्षाच्या परंपरेत यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
बैल बाजार, घोंगडी बाजार, खाऊ गल्ली, मनोरंजन, व्यापारी वर्ग तेजीत
तर मंदिरापासून तीन किलोमीटर
वाहतूक कोंडीने भक्तांची पदयात्रा
मुरबाड दिनांक ९/ म्हसा प्रतिनिधी लक्ष्मण पवार )
म्हसोबा खाम्बलिंगेश्वर यात्रेच्या अडीजशे वर्षाच्या परंपरेत यावर्षी म्हसा यात्रेने गर्दिचा उंच्चाक गाठला असून व्यापारी वर्ग , बैल बाजार, खाऊ गल्ली ,मनोरंजन विभाग तेजीत असल्याचे दिसून आले . दरम्यान मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर तीन तास वाहतूक कोंडीने भक्त भाविकांना दर्शनासाठी पदयात्रेला सामोरे जावे लागले तर काही भक्त भाविकांना घरचा परतीचा प्रवास करावा लागला
याबाबत सविस्तर वृत्त असे की सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या ठाणे जिल्ह्यात जागृत देवस्थान म्हसोबा खांब लिंगेश्वराचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तगण येत असल्याने रविवारी झालेल्या गर्दिने मोठा उच्चांक गाठला
पौष पौर्णिमेला भरत असलेली हि यात्रा शुक्रवारी सुरुवात झाली असली तरी दोन दिवस या यात्रेत नागरिकांची उपस्थिती कमी असल्याने व्यापारी वर्ग चिंतेत होता.परंतु रविवारी सुट्टी चा दिवस असल्याने लोटलेल्या गर्दी ने उच्चांक गाठला असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.तर रविवारी राष्ट्रवादी चे प्रमोद हिंदुराव यांनी दुपारी ठेवलेले स्नेह भोजन व सायंकाळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी आयोजित केलेला स्नेह भोजन व कार्यकर्ता मेळावा यामुळे कार्यकर्त्यांसह यात्रेकरुंची मोठी गर्दी झाल्याने ही वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागली.
यावेळी मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसादजी पांढरे यांनी चोख बंदोबस्त ठेवून यात्रेवर ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेरा च्या निगराणी खाली चोर चक्क्यांवर नजर ठेवली असून म्हसा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे