Type Here to Get Search Results !

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराची सुरवात



तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराची सुरवात


                            तऱ्हाडी:- ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडा वतीने घेण्यात येणारे मौजे त-हाडी त.त.येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबीराचे दि.२८ जानेवारी २३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला उद्घाटन कार्यक्रमसाठी गावातील माजी सैनिक प्रकाश वेडू पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले . तसेच या कार्यक्रमासाठी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त व प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर , उपसरपंच उजनबाई अहिरे व सुनील धनगर, माजी सरपंच सुदाम भलकार राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य तुळशीराम भाईदास भामरे मुख्याध्यापक गणेश पवार माजी उपसरपंच प्रमोद परदेशी माजी ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे, विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन संजय जाधव, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराला सुरूवात करण्यात यावेळी निवृत्त जवान प्रकाश पाटील यांनी आपल्या देशसेवा कार्यकाळातील प्रसंग , व श्रमसंस्कार विषयावर,विद्यार्थ्यांना सांगितले व प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी आजचा विद्यार्थी व युवक संस्कार विसरला आहे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनमध्ये विशेष संस्कार रुजविण्यासाठी या कार्यक्रमाची आवश्यकता असते हे शिबीर सात दिवस राहणार आहे या शिबिरात प्रत्येक दिवसी दोन वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यात -" राष्ट्रीय सेवा योजना एक संस्कार शाळा" तसेच "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ग्रामविकासात युवकांची भूमिका भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे . देश सेवा एक कर्तव्य अवयव दान श्रेष्ठ दान एड्स जाणीव. जलसंवर्धन," व्यसनमुक्ती जनजागृती, परिसर स्वच्छ, पाणलोट क्षेत्र,या विषयावर बोलणार आहेत .राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व . डिजिटल साक्षरता .एक मुठ धान्य संकलन, वित्तीय साक्षरता, अवयव दान, कोविळ संसर्ग लसीकरण " या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सी एस करंके यांनी व सुत्रसंचलन डॉ प्रा बी.एन.गिरासे व आभार प्रा डॉ.वाय.सी गावीत यांनी मानले यावेळी बामखेडा कला महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक शिक्षिका उपस्थित होते . मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष,रावसाहेब चव्हाण, कै आण्णासाहेब साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी मुख्याध्यापक एन एच कश्यप, देवेंद्र कंरके, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad