पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक येथील तीन विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत राज्य पातळीवर निवड
कंधार प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील पानभोसी नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी चे विद्यार्थी कु. माधवी भोसीकर थाळीफेक मध्ये प्रथम क्रमांक, महेश गीते लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर टेमराज गोविंद यादव याने विभागीय क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे, दिनांक 9 जानेवारी रोजी सोमवारी झालेल्या वरील विद्यार्थ्यांनी विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून राज्य पातळीवर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ईश्वरराव भोसीकर तसेच कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र भोसीकर व महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री गुलाबराव मदने,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर जिल्हा युवा उपाध्यक्ष महेश भोसीकर,उपमुख्याध्यापक मोहम्मद फैसलुद्दीन,क्रीडा शिक्षक विजय कदम,प्राध्यापक विश्वनाथ दिग्रसकर, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर,उमाकांत वाखरडकर, शंकर गीते व तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.