२५ वर्षांपासून तो करतो राष्ट्रध्वजाची इस्त्री.कोतुकाची थाप,वरुळच्या तरुणाची अशीही देशसेवा.
प्रजासत्ताक दिन विशेष......
वृत्त संकलन
देशावर आपली नितांत भक्ती असेल तर जवान बनून सीमेवर जात देशविरोधी कारवाई करणाऱ्यांशी झुंज द्यावीच लागते असे नाही,तर ती भक्ती साध्या घरबसल्या कामातूनही साध्य करता येऊ शकते.याबाबत जिवंत उदाहरण द्यावे लागेल वरुळ येथील एका तरुणाचे.
हा तरुण गेल्या २०ते २५वर्षांपासून राष्ट्रध्वजाची (तिरंगा झेंडा) मोफत इस्त्री करून देत असल्याने त्याच्या या देशभक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,३०० पेक्षा अधिक राष्ट्रध्वज आतापर्यंत त्याने मोफत इस्त्री करून दिले आहेत. ह.भ.प. भिला मंगा धोबी वय ५५ रा. वरुळ,ता.शिरपुर)असे या देशभक्त तरुणाचे नाव आहे.
हा तरुण आपला वडिलोपार्जित परीटचा (धोबी)व्यवसाय करीत असताना महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी त्याच्याकडे राष्ट्रध्वज यायचे त्याला पैसेही संबंधित लोक देऊ करायचे .परंतु मनातील देशभक्तीला हे मान्य नसल्याने त्याने कधीही पैसे घेतले नाही,गेल्या २० ते २५ वर्षांपासून तो स्वातंत्र्य,प्रजासत्ताक, मुक्तीसंग्रामदिनाला वरुळ परिसरातील ग्रामपंचायात,सोसायटी,विविध बँका, विविध शाळा ,टपाल कार्यालय,आरोग्य विभाग,महाविद्यालयातील राष्ट्रध्वज मोफत इस्त्री करून देत आहे.गेल्या २५ वर्षात त्याने ३०० /४००पेक्षा अधिक राष्ट्रध्वज इस्त्री करून दिले आहेत.हे विशेष स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताकदिन,अशा राष्ट्रीय दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी दवण्यासाठी देशभक्त आवर्जून उपस्थित राहतात, परंतु या तरुणाची ही अनोखी देशभक्ती व देशप्रेम खरच कोतुकास्पद आहे,हे मात्र नक्की.
कोट
स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी शाळेच्या कार्यक्रमातुन स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला जात असे.यातून मनात देशप्रेम रुजले.आपल्या हातून ही देशभक्ती व्हावी ,या इच्छेतुन मोफत राष्ट्रध्वज इस्त्री करून देण्याची कल्पना सुचली.
ह.भ.प भिला धोंबी,
देशभक्त तरुण,वरुळ