काँग्रेसचे प्रवीण वळवी असंख्य कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत (उबाठा) आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश
तळोदा तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रविण वळवी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
अक्कलकुवा येथील संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी शिवबंधन बांधुन प्रविण वळवी यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला.यावेळी उमरीचे माजी सरपंच बदुसिंग ठाकरे, न्युबनचे माजी सरपंच राजु सुरेश ठाकरे, बोरद ग्रामपंचायतीचे सदस्य राजु सुरसिंग पवार, उमरी पेसा अध्यक्ष सुरेश शिवल्या ठाकरे, मोरवड ग्रामपंचायत सदस्य रतीलाल वळवी, यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार,अक्कलकुवा तालुका प्रमुख मगन वसावे, शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे, ज्येष्ठ शिवसैनिक संजय पटेल हे उपस्थित होते याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार आमश्या पाडवी यांनी प्रविण वळवी यांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल असा शब्द दिला. तळोदा तालुक्यातील कॉंग्रेसचे आजी माजी सरपंच व पदाधिकारी यांचा एक मोठा प्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याचे ही सांगितले.