नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील स्मशानभूमीची स्वच्छता संकल्प ग्रुपवतीने युवकांनी साफसफाई अभियान राबविले युवकांनी सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
अक्कलकुवा येथील समशान भूमीत मागील गेल्या कित्येक वर्षांपासून स्वछता होत नसल्यामुळे, अक्कलकुवा शहरातील पांच युवकांनी काटेरी झुडपे तोडून परिसर साफसफाई केली. संकल्प ग्रुपतर्फे स्वछता करण्याचे काम हाती घेतले व काही वेळातच संपूर्ण स्मशानभूमीचा परिसर हा तरुणांनी स्वच्छ करत समाजिक बांधिलकी जपली आहे.
संकल्प ग्रुपचे योगेश साठे, विवेक सोनार, अक्षय परदेसी, प्रशांत पाटिल, कार्तिकसिंह तोमर आदि तरुणांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतले दर रविवारी स्वच्छता राबविण्यात येणार आहे. युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.