Type Here to Get Search Results !

सेवाभावे प्रतिष्ठानचे 2023 वर्षाचे कॅलेंडरचे प्रकाशन



सेवाभावे प्रतिष्ठानचे 2023 वर्षाचे कॅलेंडरचे प्रकाशन

 

  सेवाभावे प्रतिष्ठान वतीने तळोदा येथील प्रतिष्ठानच्या कार्यालयात 2023 चे कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक बी.एस.जावरे , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंजिनिअर जितेंद्र कलाल तसेच सेवाभावे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजय सोनवणे यांच्या हस्ते 2023 चे कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले,

         यावेळी प्रकाशनाच्या वेळेस सेवाभावे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजय सोनवणे यांनी 2022 मध्ये सेवाभावे प्रतिष्ठानने केलेले कार्यांचे माहिती दिली यावेळेस ते म्हणाले की, जानेवारी महिन्यात प्रतिष्ठानचे 2022 वर्षाचे कॅलेंडर आमदार राजेश पाडवी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयसिंग पाडवी, काँग्रेसचे माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी तसेच माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सीमाताई वळवी तळोदा तालुका तहसीलदार गिरीश वखारे प्रांत अधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले होते. तसेच 29 जानेवारी रोजी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आपण नैवेद्य फाउंडेशन तर्फे गरीब कर्ज लोकांना जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये सूर्यनमस्कार दिनानिमित्त तलावडी आश्रम शाळेत सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली होती. मार्च महिन्यात अंबागव्हान फाटा येथे वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. एप्रिल महिन्यामध्ये स्वर्गीय भारत सोनवणे यांच्या स्मृतिपित्यर्थ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर 121वी जयंती भगवान महावीर यांची जयंती निमित्त पाणपोई लोकार्पण करण्यात आले. मे महिन्यात तंबाखू सेवन मुक्ती दिनानिमित्त व्यसनमुक्ती अभियान मोहीम करण्यात आली.जून महिन्यात राज्यश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तलावडे येथे जिल्हा परिषद शाळेचे शैक्षणिक साहित्य देऊन जयंती साजरी करण्यात आली. जुलै महिन्यात गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजा येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात कलाल समाज वाडी येथे, कलाल समाज नवयुवक मंडळ, कृपासिंधू सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. सप्टेंबर महिन्यात कृपासिंधू सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने भव्य असे व्याख्यानेच्या कार्यक्रम छत्रपती शिवराय व आजचे तरुणाई या विषयावरती व्याख्यानमाला घेण्यात आली होती. ऑक्टोंबर महिन्यात गोपाळपूर येथे लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली तसेच अस्तंबा ऋषी यात्रेत पहिली माळ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यामध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिवसयांच्या औचित्य साधून तलावडे येथे भगवान बिरसा मुंडांची जयंती साजरी करण्यात आली व त्यांच्या विषयीचे पुस्तक लोकांना देण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात डॉक्टर सारंग माळी यांच्या मदतीने खर्डी येथे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. अशाप्रकारे सेवाभावी प्रतिष्ठानने 2022 मध्ये कार्य केले होते व पुढील 2023 मध्ये यापैकी अधिक कार्य करेल असे त्यांनी सांगितले..

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले अमित कलाल, धनंजय कलाल, महेंद्र भाऊ कलाल, छोटू भाऊ कलाल, विजयराव सोनवणे, देवेंद्र भाऊ कलाल उपस्थित होते.

          यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा कार्याध्यक्ष श्री.धनंजय कलाल सर यांनी आपले मनोगत मांडले ते म्हणालेत की, सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्य मी मागील तीन ते चार वर्षापासून बघत आहे. त्यांनी केलेले कार्य हे सर्व पार आहे. ज्याप्रमाणे प्रतिष्ठान कार्यकर्ते लोकांचे गरजा जाणून कार्य करता व पुढेही असंच करत राहो प्रतिष्ठानला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.

       या कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सागर पाटील सचिव श्रीमती.कविता कलाल कार्याध्यक्ष संतोष चौधरी, संचालक नकुल ठाकरे, अतुल पाटील, अनिल नाईक, पवन सोनवणे यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad