फुलसावंगी येथे सामूहिक विवाह मेळावा,
भागवत सप्ताहात सहा जोडपी विवाहबद्ध
फुलसावंगी प्रतिनिधी :
गेल्या २७ वर्षांपासून येथे अविरत भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी भागवत सप्ताहात शुक्रवारी सामूहिक विवाह मेळाव्यात ६ जोडपी विवाहबद्ध झाली.
गेल्या १२ वर्षांपासून भागवत सप्ताहात सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी सामूहिक विवाह सोहळ्यात ६ जोडपी विवाहबद्ध झाली. आज शुक्रवारीच भागवत सप्ताह समाप्ती
झाली. यानिमित्त गावातून दिंडी काढण्यात आली. दिंडीत भाविकांनी भाग घेतला. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवनी सोहळ्यानिमित्त २७ वर्षांपासून हा सप्ताह घेतला जातो.
पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी श्रीमद् संगीतमय भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह पार पडला. यावर्षी कथा प्रवक्ता भागवताचार्य श्री.शिवानंदजी महाराज शास्त्री, चित्रकुठधाम पैठण प्रवक्ता म्हणून भूमिका बजावली. त्यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले. सप्ताहाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.