Type Here to Get Search Results !

. उत्तम शिवराम केंझरा यांची रग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड



पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यामधील तळ्याचापाडा (वेहेलपाडा) या गावामधील कै. शिवराम गोविंद केंझरा यांचा मुलगा कु. उत्तम शिवराम केंझरा हा आत्मा मालिक ध्यानपीठ मिलिटरी स्कुल कोकमठाम, शिर्डी या शाळेचा विध्यार्थी असून याची रग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड

 प्रतिनिधी - दिनेश आंबेकर.

 विक्रमगड - पालघर जिल्ह्यामधील विक्रमगड तालुक्यातील गाव वेहेलपाडा (तळ्याचापाडा) कुमार उत्तम शिवराम केंझरा हा मुलगा येथील रहवासी असून, त्यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मावली माऊली चा कृपा आशीर्वादाने व संस्थेच्या वतीने अध्यक्ष आदरणीय मा. नंदकुमार सुर्यवंशी साहेब व सर्व ट्रश्ट् मंडळ, यांच्या मार्गदर्शनातून आत्मावलींचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर बाजी मारताहेत निवडले जाताहेत यातच शासनाच्या नामांकित योजने अंतर्गत आत्मरुप या विभागाने शिक्षण घेणाऱ्या उत्तम शिवराम केंझरा या विद्यार्थ्यांची नॅशनल साठी निवड झाली आहे.

       रग्बी इंडिया गुजरात रग्बी यांच्या संयुक्त विद्यामानाने २१/१२/२०२२ ते २२/१२/२०२२ रोजी या दरम्यान अहमदाबाद आय आय टी आय गांधीनगर गुजरात या ठिकाणी रग्बी खेळाची राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत.

     नंदुरबार या ठिकाणी झालेल्या सराव शिबिर चाचणीतून उत्तम केंझरा हा महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून खेळणार आहे. दिनांक २६/११/२०२२ ते २७/२०२२ रोजी रायगड या ठिकाणी राज्य स्तरीय स्पर्धा पार पडल्या त्यातून आत्मा मलिक ध्यान पीठ शिर्डी यातून उत्तम केंझरा व कल्पेश देशमुख या दोन विद्यार्थ्यांचा समावेश होता.

        मात्र नंदुरबार या ठिकाणी झालेल्या नॅशनल कॅंप मधून उत्तम शिवराम केन्झरा याची नॅशनल साठी निवड करण्यात आली.

       या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. सुनिल चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशवंत खेळाडूंचे परपुज्य सद्गुरू आत्मावली माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी सुर्यवंशी साहेब सर्व ट्रश्ट मंडळ तसेच संकुलाचे व्यवस्थापक सुधाकर जी मलिक सर क्रीडा विभाग प्रमुख एम. पी. शर्मा सर व सर्व क्रीडा शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. आणि जिल्ह्यातून व तालुक्यातून तसेच गावातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad