पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नंदुरबार :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज कल्याण जिल्हा परिषद, मनुदेवी फाउन्डेशन, नंदुरबार संचलित दुधाळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने शनिवार 3 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 12 वाजता मुकबधिर निवासी विद्यालय, दुधाळे ता.जि.नंदुरबार येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, कर्णबधिरासाठी तपासणी शिबिर, दिव्यांगांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दिव्यांगांनी बनविलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन तसेच युडीआडी कार्ड वाटपाचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री, नंदुरबार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावीत, खासदार डॉ.हिनाताई गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, विभागीय समाज कल्याण अधिकारी जितेंद्र वळवी उपस्थितीत राहणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहावे असे आवाहन ही श्री. नांदगावकर यांनी केले आहे.