चालतवड जव्हार येथे आत्मा अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न ्
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
काल दि.२१/१२/२०२२ रोजी मौजे चालतवड ता जव्हार येथे आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी तालुक्यात नवीन केळी पीक क्षेत्र विस्तार होत असून आज जव्हार तालुका सारख्या दुर्गम भागात २९ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे त्यात नवीन शेतकरी लागवडकरण्यास इच्छुक असून mregs मधून १५.१२.२०२२चे शासन निर्णय नुसार फळबाग लागवड आपण नवीन १०० एकरा पर्यंत म्हणजे ४०.०० हे जव्हार तालुका लागवड करण्याचे निश्चित केले आहे या साठी केविके कोसबाड चे शास्त्रज्ञ श्री. अशोक भोईर सर, प्रभारी तालुका कृषि अधिकारी वसंत नागरे , मंडळ कृषी अधिकारी गोसावी,सर्व कृषि विभाग अधिकारी कर्मचारी अजंता ऍग्रो , जैन इर्रीगेशन कंपनी चे तज्ञ प्रशिक्षक व शेतकरी बंधू यांच्या माध्यमातून केळी पीक परिसंवाद व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
श्री चंदू भोये यांचे केळी पीक शेतावर आज कार्यशाळा आयोजन करण्यात आले. यात कृषि विभाग विविध योजना, केळी पीक लागवड पासून विक्री पर्यंत सर्व माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय सांगितले व प्रत्यक्ष केळी लागवड प्लॉट वर शेतकर्यासोबत शाश्रज्ञ यांची भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच केळी उत्पादक गटाची स्थापना करून लागवड क्षेत्र वाढ व विक्री व्यवस्था करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच मिरची लागवड व शेततळे मध्ये मत्स्यसंवर्धन पाहणी करून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अशा प्रकारे जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना करण्याचे आवाहन प्रभारी तालुका कृषि अधिकारी यांनी केले तसेच शेतकऱ्यांची मागणी होती
केळी उत्पादक शेतकऱ्यांची सहल जळगाव येथे उती संवर्धित केळी लागवड क्षेत्र भेट व नवसारी गुजरात येथे केळी पीक खोडा पासून धागा निर्मिती भेटी आयोजित करून आम्हा शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर देऊन उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न कृषि विभागाकडून करण्यात यावे अशी मागणी चंदू भोये सर व शेतकऱ्यांनी केली .तसेच कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे आभार मानले.या कार्यशाळेस चालत वड व परिसर ता.जव्हार येथील ७२ शेतकरी उपस्थित होते .