Type Here to Get Search Results !

भारतीय संविधान ही राष्ट्राची संपत्ती - मुकेश कापुरे



भारतीय संविधान ही राष्ट्राची संपत्ती - मुकेश कापुरे

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महात्मा फुले एम एस डब्ल्यू आणि मातोश्री झवेरिबेन मोतीलाल तुरखिया बीएसडब्ल्यू महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एकक मार्फत संविधान सप्ताह निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते

संविधान पर्व सप्ताह अंतर्गत भारतीय संविधानाची ओळख या विषयावर प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन ग्राम विस्तार अधिकारी श्री मुकेश कापुरे हे उपस्थित होते श्री मुकेश कापुरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे असे हस्तलिखित एकमेव संविधान आहे जे लोकशाहीच्या मार्गाने चालते भारतीय संविधानात एकूण 395 कलम असून त्याची विभागणी विविध प्रकरणांमध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भारतीय संविधानात परिशिष्ट ही जोडण्यात आलेली आहेत भारतीय संविधानाने विविध कायदे केलेले आहे त्याचबरोबर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला मूलभूत अधिकार ही दिलेले आहेत त्यामुळे आज कोणीही कोणालाही मतदान करू शकत कोणतेही व्यवसाय करू शकते एखाद्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार होत असेल तर तो व्यक्ती न्याय मागू शकतो अशा अनेक गोष्टी श्री मुकेश कापुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले भारतीय संविधान व भारतीय संविधानावर आजपर्यंत आपला भारत देश चालत आलेला आहे कुठल्या धर्माचे नसून ते प्रत्येक धर्मासाठी महत्त्वाचे आहे यात कुठलाच धर्म मोठा किंवा लहान नाही प्रत्येक धर्म संविधानासमोर समान आहे देशाचे रक्षण संविधान करते तसेच संविधानानुसार जीवन जगणे हे प्रत्येक भारतीयाचे महत्त्वाचे कार्य आहे त्यानुसार आपण आपले जीवन जगले पाहिजे राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून केली

सदर कार्यक्रमासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा उषा भिमसिंग वसावे या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा निलेश गायकवाड प्रा नितीन तायडे प्रा प्रमोद जाधव हे होते कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन हे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad