Type Here to Get Search Results !

बोरद माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक भटू पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप.



बोरद माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक भटू पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप.


तळोदा तालुक्यातील बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणाचे पर्यवेक्षक भटू पवार यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

    

मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज बोरद या ठिकाणी बरेच शिक्षक व शिक्षिका हे आपल्या दातृत्वाने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अनेक शैक्षणिक गरजा भागवत असतात. त्याच्यातीलच एक दातृत्व व्यक्तमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले भटू पवार हे या शाळेत पर्यवेक्षक पदावर कार्यरत असून ते दरवर्षी गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करीत असतात.

     परंतु गेल्या कोरोना काळात विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प असल्याने आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नसल्यामुळे गणवेश सक्तीचा नव्हता. त्यामुळे गणवेशाचे वाटप त्यांच्याकरिता थांबविण्यात आले होते. परंतु यावर्षी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्यामुळे त्यांनी गेल्या दोन वर्षाची भर म्हणून यावर्षी इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गातून गरजू विद्यार्थ्यांना शोधून ज्यांना खरोखर गणवेश आवश्यकता आहे. घरी गणवेश घेण्याची परिस्थिती नाही अशा ९ विद्यार्थिनी व एक मुलगा एकूण १२ विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेशाचे वाटप केले आहे व त्यांना गणवेश घालून नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.

   त्यांच्या या दातृत्वाचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी व  शाळेचे प्राचार्य निलेश सूर्यवंशी तसेच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. 

     त्यांच्या या दातृत्वाने विद्यार्थी भारावून गेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad