नंदुरबार येथे 2 जानेवारी रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन
नंदुरबार :- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 15 ते 29 वयोगटातील युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करुन युवावर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, नंदुरबारच्यावतीने डी.आर.हायस्कुल, नंदुरबार येथे सोमवार 2 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2022-2023 मध्ये लोकनृत्यासाठी (20 कलाकार संख्या,) व लोकगितासाठी (10 कलाकार संख्या) या दोन प्रकारात हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवांत सहभागासाठी कलाकार, सहकलाकार, साथसंगत देणाऱ्याचे वय 12 जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्ष पुर्ण असावे. तर 29 वर्षांपर्यंन्त कलाकारासाठी 12 जानेवारी, 2008 ते 12 जानेवारी 1994 नंतरचा जन्म असणे आवश्यक राहील. युवा महोत्सवात सिंथेसाईझार इत्यादी प्रकारामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वाद्य वापरण्यास तसेच लोकनृत्यासाठी टेप,सीडी, पेनड्रॉईव्ह इत्यादी साहित्य वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही.
नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय तसेच कला व क्रीडा मंडळातील अधिकधिक इच्छुक कलावंतानी युवा महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी 30 डिसेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर 8669168483 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती. पाटील यांनी केले आहे.