Type Here to Get Search Results !

ईस्लापूर | काळ्या बाजारात जात असलेले रेशन धान्य गावकऱ्यांनी रंगेहात पकडले.


काळ्या बाजारात जात असलेले रेशन धान्य गावकऱ्यांनी रंगेहात पकडले.


इस्लापुर: कोसमेट येथील स्वस्त धान्य दुकान क्र, 60 चे परवाना असलेले चालक मनीष कुंदनलाल जैस्वाल हे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्र, AP01 X3944
या गाडी मध्ये गहू पोते 58 प्रत्येकी 50 किलो धान्य वाटप न करता काळ्या बाजारात विकण्यासाठी शासकीय धान्य खाजगी गाडी मध्ये भरून वाहतूक करत असल्याचे गावकऱ्यांनी रंगे हात पकडले .


त्या संबंधी तलाठी विश्वास फड यांना कळविले असता. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मालासह गाडी ताब्यात घेऊन करंजी येथील पोलिस पाटील विलास गंगाराम व्यवहारे यांच्या ताब्यात दि.25/11/2022 रोजी देण्यात आला . आज 26/ नोव्हेंबर 2022 रोजी सदरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार रफीक शेख व तलाठी विश्वास फड यांनी कोसमेट व सोनपेठ येथील रास्त दुकानातील शिल्लक मालाची चौकशी व तपासणी करून सदरील रास्त दुकानातील काळ्या बाजारात जात असलेल्या गाडीतील गव्हाचे पोते करंजी येथील पोलिस पाटील यांच्या ताब्यात ठेवलेला माल इस्लापूर येथील शासकीय गोडाऊन विशाल संतोष दुधेवाड गोडाऊनपाल यांच्या ताब्यात दिला आहे .


 सदरील प्रकरणाची चौकशी करून डि एच ओ ऑफीस अहवाल पाठवला आहे असे नायब तहसीलदार रफीक शेख यांनी माहिती दिली . सदरील पंचनामा केल्याची प्रत मागितली असल्यास संबधीत अधिकार्‍याकडून टाळाटाळ करण्यात आली. काळ्या बाजारात जात असलेल्या स्वत धान्य वाटप न करता बाहेर विकल्या जात आहे. तरीही महसूल प्रशासन यावर कोणते पाऊल उचलणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष वेधले आहे .


91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad