निंगनूर प्रतिनिधी :- मैनोदिन सौदागर
येथील ग्राम विविध सहकारी संस्थेचे संचालक माजी सरपंच बालाजी महाले यांची उमरखेड तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघावर प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
निंगनुर ग्राम विविध सहकारी संस्थेच्या दि . 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत सर्व संचालकांनी सर्वानुमते तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीवर ग्राम विविध सहकारी संस्थेच्या एकंदरित संचालकांपैकी देण्यात येणाऱ्या तालुका प्रतिनीधीपदी बालाजी महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निंगनुर ग्राम विविध सहकारी संस्थेच्या दि . 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत सुचक मारोती मोतेवाड यांनी सुचविलेल्या त्यांच्या नावाला गजानन पंडागळे यांनी अनुमोदन दिले.
या सभेला भारतसिंह ठाकूर, उपाध्यक्ष पंचफुला राठोड , राजेन्द्र नावडे, मारोती मोतेवाड, संदिप मुडे सैयद जानी सै . लाल , सुधाकर जाधव, दिगांबर गव्हाळे, गजानन पंडागळे, वच्छलाबाई बरडे अनुसया मुडे सुभद्राबाई मुडे , पंकज मुडे बँक प्रतिनीधी मारोती गव्हाळे, मैनोद्दिन सौदागर स्विकृत सदस्य रविन्द्र वाकोडे लिपिक संदिप वाघमारे.आदिंची प्रमोद जैस्वाल. बिरजुलाल मुडे.इमरानखाँन.शरद पंडागळे. इदंल चव्हाण. सुदंर राठोड. पि सि भोळे.नयुम नवाब.डॉ सुनील बरडे.विजय देवकते. सुशिल गव्हाळे. अंकुश राठोड. अनेक नागरिक उपस्थिती होती.