श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा तथा मा. आ. आदरणीय सौ. अमिताभाभी अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथील शासकीय रुग्णालय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील महिला सशक्तीकरण झाले पाहिजे हा ध्यास अमिताभाभी चव्हाण यांचा आसल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला असे मत माध्यमांशी बोलताना या उपक्रमाचे आयोजक प्रा. परमेश्वर पौळ म्हणाले. या वेळी अर्धापूर शासकीय रूग्णालयातील परिसरात वृक्षारोपण व रुग्णांना फळांचे वाटप नगरपंचायत अर्धापूरचे नगराध्यक्ष मा. छत्रपती कानोडे ,अर्धापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी मा. शैलेश फडसे, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पाटील , डॉ. आनंद शिंदे, नगरसेवक प्रतिनीधी विशला लंगडे, मा. सलिम कुरेशी,मा. नामदेव सरोदे , मा.रणधीर लंगडे, नर्स मा. अंजली ससाने, श्री. संगेवार आदी मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष मा. छत्रपती कानोडे बोलताना म्हणाले की 'प्रत्येकाने स्वत: जबाबदारी घेऊन पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. रुग्णालय परिसरात मा.आ.अमिताभाभी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेली रोपे नक्कीच रुग्णालयाचा परिसर हरितमय करतील.' याप्रसंगी प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी मा. शैलेश फडसे यांनी रुग्णालयातील रूग्णासोबत संवाद साधून तेथील भौतिक सेवासुविधेचा आढावा घेतला. यावेळी रुग्णा संवाद साधताना म्हणाले की रुग्णांनी पोषक आहाराचे सेवन केले की आपण आजारी कमी पडतो. त्यामुळे पोषक आहार घेण्यासंदर्भात आव्हान केल. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पाटील रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या महिला सोबत संवाद करताना ते म्हणाले की 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित असते' त्यामुळे तुम्ही पोषक आहार सेवन करत जा शिवाय किरकोळ आजरापासून दुर राजकारणासाठी आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवून आरोग्याची काळजी घ्या. या कार्यक्रमाचं आयोजन परमविश्व फाउंडेशने केलं होत. परमविश्व फाउंडेशनचे आपल्या प्रियजनांचे वाढदिवस पर्यावरण संवर्धन व समाज कल्याणकारी उपक्रम घेऊन साजरे करत असत. आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एन.एस.एस. प्रतिनिधी सदीप काळसारे, अभियंता योगेश पौळ, ओमकार पुयड, अमरदिप कशिदे, संकल्प थोरात, गणराज पिंपळपल्ले यांनी परीश्रम घेतले.
मा.आ.अमिताभाभी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर शासकीय रुग्णालयात वृक्षारोपण करुन रुग्णांना फळांचे वाटप.
गुरुवार, ऑक्टोबर ०६, २०२२
0