Type Here to Get Search Results !

हिमायतनगर येथे `बुद्ध आणि त्यांचा धम्म´ या ग्रंथाची सांगता




हिमायतनगर येथे `बुद्ध आणि त्यांचा धम्म´ या ग्रंथाची सांगता




 हिमायतनगर ता. तालुका प्रतिनिधी: एम. यु. हनवते दि.9/10/2022 वार रविवार रोजी हिमायतनगर येथील 'नालंदा बुद्ध विहार' येथे वर्षावासा निमित्त्य मागील तीन महिन्यापासून उपा.गोविंद चांदू कांबळे यांच्या हस्ते ग्रंथ वाचनाला सुरुवात झालेली होती व काल रविवार रोजी अश्विन पौर्णिमेनिमित्त्य या ग्रंथातील शेवटची समस्त मानव कल्याणाची प्रतिज्ञा देऊन व भोजनदानाने या ग्रंथाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्रंथ वाचन करणारे आयु. गोविंद चांदू कांबळे यांचा भा. बौद्घ महा.सभा तालुका शाखेच्या वतीने कपडेरूपी आहेर देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर `धम्म चक्र प्रवर्तन दिन´ उत्कृष्ट साजरा केल्याबद्दल कार्य कारिणी निवड मंडळातील सर्व सदस्यांची तालुका शाखेच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा हस्ते बुद्धगाथेची पुस्तिका व प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.ह्या कार्यक्रमासाठी गावातील सर्व श्रद्धावान, शिलवान बौद्धउपासकांनी भोजनदानासाठी अन्न धान्याच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात मोठया प्रमाणात सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भा.बौद्ध महा. सभा तालुका अध्यक्ष आ.प्रताप लोकडे सर हे उपस्थिती होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून आ.शाहीर बळीरामजी हनवते, जिल्हा संघटक आ.पुंडलिक प्रभुजी कदम, ज्येष्ठ सा.कार्यकर्ते आ. सुभाषजी दारवंडे, आ.प्रताप कऱ्हाळे सर, आ.घोडगे सर आ. विश्वनाथ खिराडे सर आदींची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सर्व पदाधिकारी / 'नालंदा बुद्धविहार बांधकाम समितीचे' सर्व सभासद आयु.सुरेश गाडपाळे सर ,बाबासाहेब मुनेश्वर ,कोंडबा मामजी हनवते, आयु. केशवजी गायकवाड, आयु.भालचंद्र पोपलवार, आयु. चंद्रकांत हनवते, आयु.पंचफुलाबाई लोणे गोदावरीबाई लोखंडे व तसेच `समता सैनिकदलाचे´ सर्व कार्यकर्ते गावातील सर्व बौद्ध उपासक/ उपासिका बालक बालिका या सर्वानी परिश्रम घेतले.सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा कोषाध्यक्ष आयु. शिवाजी कदम सर यांनी केले तर सूत्र संचालन एम.यु हनवते सर यांनी पारपाडले अध्यक्षीय भाषणाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad