पत्रकार दिनेश आंबेकर
जव्हार शहरात दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ रोजी कुस्त्यांचे जंगी सामने जुना राजवाड्यामध्ये संपन्न झाले. संस्थान काळापासून जव्हारचा दरबारी दसरा साजरा होत असून, दरबारी दसरा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जुना राजवाडा येथे कुस्त्यांच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ग्रामपंचायतीची आचारसंहिता असल्याने सर्व नियम पाळुन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कुस्त्या पाहण्यासाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यातून हौशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २ वर्ष या कुस्त्या बंद होत्या. परंतु यावर्षी या कुस्त्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैलवान नाशिक, शिर्डी, मनमाड नगर, भिवंडी, चाळीसगाव व जव्हार ,मोखाडा भागातून कुस्ती खेळण्यासाठी आले होते.
जव्हार नगरपरिषद, अर्बन बँक, तसेच अर्बन बँकेचे संचालक व नागरिकांच्या सहभागातून कुस्ती पैलवानांना रोख रक्कमा बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमात एकूण २०० कुस्त्या खेळवण्यात आल्या. साधारण १०००हजार ५००० हजार व पुढे ८००० हजारापर्यंत कुस्ती पैलवानांना रोख रखमा देण्यात आल्या. शेवटच्या दोन कुस्त्या आली शहा , चाळीसगाव व शत्रुघ्न भोईर तसेच नारायण कारभारी व भाऊसाहेब मार्तंड यांच्यात झाली या मध्ये शत्रुघ्न भोईर व नारायण कारभारी यांनी कुस्त्यां जिंकल्या दोघांनाही रोख रक्कम ८५०० व शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ जेष्ठ समाज सेवक विजय घोलप यांच्या हस्ते देण्यात आले. या कुस्त्यांचे पंच म्हणून अनंता घोलप, विवेक शिरसाट, इक्बाल कोतवाल, संजय वनमाळी, चित्रांगण घोलप, सुनील ठमके, डहाळे बुवा,निवॄत्ती बेनके,त्रिंबक बेनके यांनी काम पाहिले तर कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे समालोचन मनीष घोलप यांनी केले. सर्व पंचांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगर पालीकेचे सभा अधिक्षक उत्तम शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी उत्तम शेवाळे, नरेश भोईर, कल्पेश गारे,मुद्दतसर मुल्ला,पंढरी बेनके,रमेश भरसट यांनी विशेष परिश्रम घेतले.