अक्षराज - दिनेश आंबेकर.
जव्हार तालुक्यात 46 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगदी शांततेत पार पडल्या. जव्हार तालुक्यात एकूण 50 ग्रामपंचायती असून 2 ग्रामदान मंडळे आहेत. त्यांची मुदत संपली नसल्याने त्या ग्रामदान मंडळाच्या निवडणुकांना आणखी कालावधी आहे, तर वावर -वांगणी ह्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी 7:30 la मतदानाला सुरुवात झाली . दुपारपर्यंत तुरळक मतदान झाले मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.
यावेळेस शिंदे सरकारने सदस्यांमधून सरपंच हा निर्णय बदलून थेट जनतेतून सरपंच निवडायचा निर्णय घेतल्यामुळे तालुक्यात निवडणुकांना रंगत आली होती. प्रत्येक राजकीय पक्षाने सरपंच पदासाठी सक्षम उमेदवार उभे केल्यामुळे गाव पातळीवरील वातावरण तापले होते. तालुक्यातील रायतळे, झाप, धानोशी, डेंगाचीमेट, जुनी - जव्हार, तसेच आकरे अश्या मोठ्या ग्रामपंचायतीवर राजकीय पक्षांनी अधिक भर देऊन आपलाच सरपंच निवडून कसा येईल याकडे विशेष लक्ष दिले होते, मात्र आज मतदारांनी आपले मत मतपेटीत बंद केले असून मतमोजणीच्या दिवशी मतदारांनी कोणाला कौल दिला हे समजणार आहे. आज जव्हार तालुक्यात झालेले मतदान आकरे या ग्रामपंचायतीमध्ये हे शांततेत पार पडले असून, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
ग्रामपंचायत आकरे मधील मतदान हे शांततेत पार पडले असून यामध्ये पोलीस कर्मचारी लेडीज स्टाफ पूर्ण दिवसभर मेहनत करीत होत्या, तसेच ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे जव्हार तालुकाध्यक्ष दिनेश आंबेकर हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दिवसभर बंदोबस्तसाठी उपस्थित होते, आणि पोलीस कर्मचारी स्टाफला मदत करीत होते.