Type Here to Get Search Results !

जरंडीतील त्या वानराला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश.




जरंडीतील त्या वानराला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश.

जरंडी ता सोयगाव येथे त्या पिसाळलेल्या वानराला अखेर वनविभागाने जेरबंद केले,दुसऱ्या छायाचित्रात वनविभागाच्या पथक...
सोयगाव, दि.२७..वनविभागाचे पथक गावात आल्याची कुणकुण लागताच गावात उंच जागेवर सुरक्षित होण्यासाठी पळ काढलेल्या त्या पिसाळलेल्या वानराला मंगळवारी पहाटे आठ वाजता जेरबंद करण्यात यश आले आहे,त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे 




 जरंडी ता सोयगाव येथे गेल्या आठवडाभरापासून एका वानराने मोठा उच्छाद मांडला होता, त्यातच ग्रामस्थांवर हल्ले चढवून गंभीर जखमी करण्याचा प्रमाणात या वानराची वाढ झाली होती वनविभागाकडून एकच वानर समजून त्यास पकडण्यासाठी मोठे प्रयत्न केले,परंतु सदरील वानर अतिशय चपळ निघाल्याने त्या वानराने वनविभागाच्या पथकाला चपराक दिली,परंतु अखेरीस मंगळवारी वनविभागाने शीघ्र रेस्क्यू मोहीम हाती घेत गावात पिंजरा लावून त्या वानराला जेरबंद केले वानर पिंजऱ्यात अडकताच त्याचा दरवाजा बंद करून त्या वानराला जेरबंद करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

त्या वानराला मंगळवारी पहाटेच वनविभागाचे वाहन दिसताच त्या चपळ वानराने पुन्हा एका झाडावरून धूम ठोकली व गावात उंच ठिकाणी सुरक्षित स्थळी बस्तान हलविले, परंतु वनविभागाने कल्पकतेने त्या वानराच्या परिसरात पिंजरा लावून त्या परिसरात खाण्याच्या वस्तू रस्त्यावर टाकून अखेरीस पहाटे पहाटे भुकेल्या पोटी असलेल्या वानर अखेरीस खाण्याच्या अपेक्षेने वनविभागाच्या जाळ्यात अडकले वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ,वनपाल गणेश सपकाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुनील हिरेकर, गणेश चौधरी, अमृत राठोड,शरीफ तडवी,आदींनी ही कारवाई केली..

अखेर मंगळवारी त्या वानरचा मुक्काम जरंडीतून हकविल्या नंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad