महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या उपाध्यक्षपदी सोमनाथ हुलगे निवड
बेंबळे । येथील ऊस व केळी उत्पादक सोमनाथ भास्कर हुलगे यांची महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे . निवडीचे पत्र त्यांना महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील यांच्याकडून देण्यात आले . ऊस शेतीमध्ये केलेले नवनविन प्रयोगाने ऊसामध्ये घेतलेले विक्रमी एकरी ११७ टनाचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे . ऊस उत्पादकांना मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पादन वाढीसाठी असलेल्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते , त्यांच्या या निवडीने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस शेती विषयी मार्गदर्शन मिळणार आहे . ऊस उत्पादकांना मार्गदर्शन व सहकार्य करून त्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचा मनोदय सोमनाथ हुलगे यांनी यावेळी केला .