राज्यात एकूण 305 कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत. शासनाकडून राज्यातील बाजार समित्यांचे स्टेट लेव्हल रँकिंग आज प्रसिद्ध करणेत आले. सातारा जिल्ह्यात फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा पहिला क्रमांक आला आहे कोल्हापूर विभागात दुसरा तर संपूर्ण राज्यामध्ये 38 वा क्रमांक आला आहे.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे नेतृत्वाखाली तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद आणि आमदार फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ मा. दिपकराव चव्हाण आणि मा.चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा)यांचे कल्पक दृष्टीकोनातून सर्व संचालक मंडळाने शेतकरी,कष्टकरी यांचे हितास्तव काही धाडसी व विधायक धोरणात्मक निर्णय घेतले.सदर निर्णयाची अंमलबजावणी बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर आणि त्यांचे सहकारी सर्व स्टाफ योग्य समन्वय व बेस्ट टीम वर्कचे माध्यमातून प्रभावीपणे करत आहेत.
आजचे ranking हे फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक लोकाभिमुख करण्याचा सर्वांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे द्योतक असे या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते.