Type Here to Get Search Results !

फलटण-कोरेगाव विधानसभा शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र व सदस्य नोंदणी फाॅर्म शिवसेनाभवन येथे सुपूर्द




फलटण-कोरेगाव विधानसभा शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र व सदस्य नोंदणी फाॅर्म शिवसेनाभवन येथे सुपूर्द

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्यावतीने शिवसेनाभवन येथे प्रतिज्ञापत्र व सदस्य नोंदणीचे फाॅर्म जमा करुन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम निस्वार्थपणे ठाम आहोत याची ग्वाही सर्वांनी दिली. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेला खुप चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम करत आहेत. पण सर्वकाही भोगुनही काही असंतुष्ट व स्वार्थी लोकांनी शिवसेनेच्या जीवावर मोठे होऊन शिवसेनेच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. परंतु त्यांना आगामी काळात निष्ठावान शिवसैनिक व महाराष्ट्रातील तमाम जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खरे निष्ठावान व कट्टर शिवसैनिक शिवसेना सोडुन कुठेही गेलेले नाहीत. शिवसेना संकटात असताना जो शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन लढतोय तोच खरा शिवसैनिक. संकटसमयी मैदान सोडुन स्वार्थासाठी पळून जाणारे खरे शिवसैनिक नसल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षवाढीच्या दृष्टीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिवाकरजी रावते यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच शिवसेना भवन येथे शिवसेना उपनेते सन्माननीय नितीनजी बानुगडे पाटील, युवा सेना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अमोलजी किर्तीकर, माजी आमदार बाबूरावजी माने यांचीही भेट घेण्यात आली.

प्रतिज्ञापत्र व सदस्य नोंदणीचे फाॅर्म जमा करताना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हा प्रमुख अमोल आवळे, फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, शैलेंद्र नलवडे, आदित्य गायकवाड, मनोज गोसावी, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, प्रभारी शहर प्रमुख निखील पवार, सोशल मिडीया प्रमुख प्रशांत तावरे, विभाग प्रमुख किसन यादव, विभाग प्रमुख तुषार वाडकर, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, उपविभाग प्रमुख अभिजीत भोसले, सुरवडी शाखाप्रमुख दत्तात्रय मदने व मलटण शाखाप्रमुख अक्षय तावरे, बबलू रजपूत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad