Type Here to Get Search Results !

पडेगाव, गोविंदवाडी जी.प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप




पडेगाव, गोविंदवाडी जी.प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कांकरिया ट्रस्टचा पुढाकार




गंगाखेड /प्रतिनिधी
आरोग्य सेवा, अन्नदान, कृत्रिम अवयव दान ,आदी क्षेत्रात मदत करण्याचा नावलौकिक असलेल्या कांकरिया ट्रस्टच्या पुढाकारातून सोमवारी पडेगाव व गोविंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.




पडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जाधव हे होते. प्रमुख पाहुन्या म्हणून भोलारामजी कांकरिया ट्रस्टच्या प्रमुख मंजूताई दर्डा, सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर, माजी चेअरमन तुळशीदास काका निरस, अमर करंडे भानदास दगडे आदींची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे संचालन माधव मुंडे सर यांनी केले . कदम, मराठे, जाधव, घोडके , कराळे आदीं शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर गोविंदवाडी येथील जिल्हा परिषद च्या शाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि माधव राठोड सर हे होते. शाळेतील शिक्षिका कुंभार मॅडम यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एखाद्या संस्थेने मदत करावी अशी भावना व्यक्त केली होती.




गोविंदवाडी येथे अंगणवाडी ताई भाग्यश्री देवकाते, शिवाजी देवकते, गणेश देवकते, माधव देवकते, सोपान देवकते उपस्थित होते. कांकरिया ट्रस्ट च्या वतीने कोरोना काळातही गरजू, उपाशी झोपणाऱ्या व्यक्तींना30000 जेवनाचे डब्बे तसेच कोविड कालावधित गरजवंत 121 कुटुंबीयांना दत्तक घेऊन सहा महीने पर्यंत प्रत्येकी ₹2000/- चे राशन पुरविण्याचे काम करण्यात आले होते . माणुसकीची भिंत च्या माध्यमातून गरजूंना कपडे, अन्न-धान्य,भांडीकुंडीची मदत करण्याचे काम या ट्रस्टच्या वतीने नेहमीच्या केले जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चालू शैक्षणिक काळात पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवण्याचा व दत्तक घेन्याचा संकल्प ट्रस्टच्या वतीने करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad