Type Here to Get Search Results !

धन्वंतरी डॉक्टर दादा केळकर यांच्या पुण्यस्मरणा निम्मित श्री.चारुदत्तबुवा आफळे यांच्या कीर्तनाचे आयोजन





डॉ. व्यंकटेश शिवराम तथा दादा केळकर हे स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळामध्ये सांगोल्यात 'धन्वंतरी' 'पोलादी पुरुष म्हणून सुप्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रात धन्वंतरी, राजकीय क्षेत्रात पोलादी पुरुष आणि सामाजिक क्षेत्रात एक दानशूर आणि स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांना दूर करणारा 'योद्धा कर्मयोगी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पत्नी सौ. चंपूताई या फुल ट्रेन्ड नर्स होत्या व वैद्यकीय तसेच सर्व क्षेत्रात त्यांनी दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे सर्व प्रकल्प यशस्वी करण्यात फार मोठे योगदान दिले. डॉ. दादांची पुढील पिढी डॉ. सतीश व सून डॉ. संजीवनी यांनी वैद्यकीय तसेच सामाजिक सेवेच्या क्षेत्रात 'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आपल्या कर्तबगारीचा खोल ठसा उमटविला आहे. सामाजिक क्षेत्रात परिवर्तन घढवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक महिला सबलीकरण व ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण' देण्याचे स्वप्न साकार केले आहे.


नुकत्याच झालेल्या SSC बोर्ड परीक्षेचा उत्कर्ष विद्यालयाचा निकाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्वच म्हणावा लागेल. सतत 5 व्या वर्षी 100% विद्यार्थी पास होण्याचे सातत्य राखले आहे. या शाळेतून 61 मुले परीक्षेला बसली. त्यातील 31 मुलांना 90% पेक्षा अधिक मार्क 18 मुलांना 80 % पेक्षा अधिक मार्क सर्व उत्तीर्ण मुले 60% च्या आसपास आहेत.


डॉ. केळकरांची तिसरी पिढी म्हणजे डॉ. रणजीत (स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ) आणि डॉ. मुपर्णा (बालरोगतज्ज), मागील पिढ्यांच्या दातृत्व आणि कर्तृत्व या दोन स्तंभांच्या आधाराने उभ्या असलेल्या मजबूत इमारतीवर तालुक्यातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उभारून कळस चढविला आहे.


डॉ दादा केळकर यांनी अतोनात कष्ट करून रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेचा पाया घातला. त्यांच्या या निस्वार्थ सेवाब्रतासाठी कीर्तन / प्रवचन ही माध्यमे त्यांची वैचारिक बैठक ठरविण्यात प्रभावी ठरली. असा त्यांचा स्वानुभव आणि विश्वास होता. आणि त्यामुळे सांगोल्यातील सर्वसामान्य नागरीकापर्यंत मूल्याधिष्ठीत विचारसरणी पोचविण्याचे काम त्यांनी स्वेच्छेने अंगिकारले आणि १९४४ ते १९९४ पर्यंतच्या ५० वर्षांच्या काळात अनेक उत्कृष्ठ कीर्तनकारांना ८/८ दिवसाची निवास व भोजन व्यवस्था स्वतः करून सांगोल्यातील माणसांची जडण-घडण 'माणूस' म्हणून हवी याच कल्पनेचा हट्ट धरला.


१९५६ यावर्षी डॉ. दादांनी बांधलेला दवाखाना आता अपुरा पडू लागल्याने डॉ. रणजीत व सुपर्णा यांनी भव्य, प्रशस्त, हवेशीर व प्रसन्न अशी नवीन वास्तू बांधली आहे. या नव्या वास्तूत प्रवेशाच्या मुहतांनिमित्त नी. डॉ. दादांचे पुण्यस्मरण आज सर्वांना प्रेरणादायी ठरावे यासाठी महाराष्ट्रातील अव्वल कीर्तनकार श्री. चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन डॉ. केळकर कुटुंबीयांनी शनिवार दि. २५ जून २०२२ रोजी दु. ३ ते ५ या वेळेत उत्कर्ष विद्यालय, सांगोला येथे आयोजित केले आहे. कीर्तनाचा विषय 'अवघाची संसार सुखाचा करीन असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. केळकर कुटुंबीयांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News