चिकना गावातील पहिली एमबीबीएस डॉक्टर कांचन बून्नावार
धर्माबाद तालुक्यातील असलेल्या चिकना गावातील शेतकरी कुटुंबातील यादवराव नारायणराव बून्नावार यांची नात डॉ कंचन अविनाश बुन्नावार हिने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथून एमबीबीएस डिग्री संपादन केल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन .
कांचन हिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा हिमायतनगर येथे झाले .आठवी ते दहावी महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड येथे झाले.अकरावी व बारावी सायन्स कॉलेज नांदेड येथे शिक्षण झाले नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथे एमबीबीएस ला प्रवेश भेटून आज एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल कांचन हिचे अनेकांनी अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिरिशे.