पेठ पारगाव येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता
ता.१६/५/२०२२ पेठ पारगाव तालुका आंबेगाव. इथून दिनांक १४ रोजी अनुज दत्तात्रेय शेलार (१५ वर्ष) या मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार अल्पवयीन मुलाचे वडील दत्तात्रय बबन शेलार वय ३९( पेठ पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे). यांनी मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सविस्तर माहिती अशी की दिनांक 14 रोजी फिर्यादी वडील कामावर गेले होते. त्यांची मुलगी व पत्नी हे खेड येथे पूजेच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी पंधरा वर्षाचा मुलगा अनुज हा जनावरांची देखभाल करण्यासाठी करीत थांबला होता.
फिर्यादी सायंकाळी सात वाजता कामावरून घरी आल्यानंतर त्यांना अनुज घरी न दिसल्यामुळे, त्यांनी पत्नीला फोन करून अनुज ला तुम्ही बरोबर घेऊन गेले का विचारले? हा त्यावेळी त्यांनी आमच्या बरोबर आला नसल्याचे सांगितले. कुटुंबियांनी आजुबाजूला परिसरात, गावात खेड एसटी स्टँड वरती येथे शोधले असता तो मिळून आला नाही.त्याचे मित्र, नातेवाईक, परिचित यांच्याकडे चौकशी केली असता मिळून आला नाही.
अनुज दत्तात्रेय शेलार पंधरा वर्षे १५ याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी मंचर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत .
आंबेगाव( पुणे,)तालुका प्रतिनिधी कैलास गायकवाड