Type Here to Get Search Results !

प्राचार्य संजय ठावरी यांचा सेवा कार्याबद्दल सत्कार स्टुडंन्ट फोरम ग्रुप कोरपना द्वारा कार्यक्रम

प्राचार्य संजय ठावरी यांचा सेवा कार्याबद्दल सत्कार स्टुडंन्ट फोरम ग्रुप कोरपना द्वारा कार्यक्रम



कोरपना प्रतिनिधी. मनोज गोरे
वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपनाचे माजी प्राचार्य व नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूरचे संचालक संजय ठावरी यांचा स्टुडट फोरम ग्रुपचे वतीने आयोजित शैक्षणिक, सांस्कृतिक, व क्रीडा महोत्सवाप्रसंगी सेवाकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे हस्ते जीवन गौरवपत्र ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरून निमजे, महीला आघाडीच्या बेबीताई उईके,रंगारी मॅडम, माजी नगरसेवक सोहेल अली, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे, चंद्रपूर जिल्हा बँक कोरपनाचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक अनिल रेगुंडवार,गुरुदेव कॉटन जीनिंगचे संचालक शांताराम देरकर आदी उपस्थित होते. 
प्राचार्य ठावरी यांनी आपल्या सेवाकाळात,अनेक गुणवंत व सुसंस्कारित विद्यार्थि घडविण्यास शाळा महविद्यालयांमध्ये उपक्रम राबविले. त्यांच्या पुढाकारातून माजी विद्यार्थी मेळावा , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी यशस्वी कार्यक्रम आयोजित केले. २०१४ ला माजी विद्यार्थीनी एकत्रित येऊन स्टूडेंट फोरम ग्रुप ची स्थापना केली. त्यानंतर पहिल्याच वर्षी सरांचे वाढदिवसाचे औचित्य साधून २०१५ ला ऊन्हाळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेतले. त्याला त्यांचे मार्गदर्शन लाभले.
 त्यानंतर ग्रुप दरवर्षी महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धा व विविध सामाजिक उपक्रम घेत आहे, कोरपना येथे स्वच्छता अभियान,वृक्ष लागवड साठी ठावरी सर यांनी प्रयत्न केले. द्रोणाचार्य सार्वजनिक वाचनालय निर्माण केलेk जून २०१८ ला एम.पी.एस.सी बरोबरच प्रशासकीय सेवेतील अधिकारी होण्यास तरुणांना प्रोत्साहन देण्यास डॉ.नरेशचंद्र काठोडे यांची मिशन आय. ए. एस. कार्यशाळा घेतली. कोरपना सारख्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad