बुद्धेहाळ करांडेवाडी येथे लक्ष्मीदेवी यात्रे निमित्त युवाहृदयसम्राट डॉ अनिकेत (भैया) देशमुख यांचे बुद्धेहाळ करांडेवाडी नगरीत आगमन फटाक्यांच्या आतषबाजीत व हालग्यांच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले.
त्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांसह डॉ अनिकेत (भैया) देशमुख यांनी लक्ष्मी देवीचे दर्शन घेतले यावेळी बुद्धेहाळ करांडेवाडीतील पंचक्रोशीतील सर्व नेतेमंडळी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिर समीतीने डॉ अनिकेत देशमुख यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करून सन्मान करण्यात आले
युवाहृदयसम्राट मा. डॉ. अनिकेत (भैया) देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील सुपुत्र पैलवान सचिन काळेल यांनी राज्यस्तरीय येथे झालेल्या कुस्ती स्पर्धा ग्राफीलिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल विजेता व तसेच राष्ट्रीय ग्राफीलिंग कुस्ती स्पर्धेत 77 किलो वजन गटामध्ये कास्य पदक पटकावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
बुद्धेहाळ करांडेवाडी येथे लक्ष्मीदेवी यात्रे निमित्त कुस्त्यांचे विराट मैदान भरवण्यात आले होते बुद्धेहाळ (करांडेवाडी)ता.सांगोला येथे जनसेवक युवाहृदयसम्राट मा.डॉ.अनिकेत (भैया) देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडल्या
व तसेच यासाठी अनेक मल्ल उपस्थित होते. त्याठिकाणी उपस्थित राहून डॉ.अनिकेत भैय्या देशमुख यांनी कुस्तीमधील अनेक डावपेच व त्यांना समोरचा मल्ल कसा प्रतिउत्तर देतो हे पहान्यासाठी आवरजून उपस्थीत राहिले होते डॉ.अनिकेत भैय्या देशमुख यांच्या उपस्थती मुळे मल्लांनमध्ये नवचैतन्य पहावयास मिळाले तसेच कुस्त्या पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील कुस्ती शोकीन उपस्थित होते
या कुस्त्या पार पाडण्यासाठी सरपंच , उपसरपंच ग्रा.पंचायत सदस्य व विकास सेवा सोसायटीचे चेअरमन , व्हा. चेअरमन , संचालक व बुद्धेहाळ करांडेवाडीतील ग्रामस्थ असंख्य कुस्ती प्रेमी उपस्थित होते.