आंबेगाव तालुका प्रतिनिधी
ता.११ पत्नीचा वारंवार छळ करून तिला उपाशी पोटी ठेवून घरातून दिल्याप्रकरणी पती सुभाष श्रीपत बारवे ( रा.म्हाळुंगे पडवळ मळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे / सध्या रा. चिंचपाडा गाव श्रावण मात्रे चाळ रूम नंबर १२ बालाजी ज्वेलर्स जवळ कल्याण पूर्व) त्याच्यावर मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी च्या पती ने ऑगस्त २०१९ पासून२०/१/२०२२ पर्यंत पत्नी आशा हिला चिंचपाडा गाव कल्याण येथे राहते घरी किरकोळ कारणावरून वारंवार शिवीगाळ करणे,मारहाण करणे शारीरिक इजा करणे, उपाशी ठेवणे अशा प्रकारचा शारीरिक छळ करत होता.
फिर्यादीचे नांदण्याची इच्छा असूनही, तिला घराबाहेर काढले, याबाबत पती वर पत्नी आशा सुभाष बारवे हिने सध्या राहणार कळंब काळे मळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे.भादवि कलम ४९८(अ )३२३,५०४,५०६ प्रमाणे मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाआहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक होडगर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार साबळे हे करत आहेत.