Type Here to Get Search Results !

यवतमाळ | घरकुलाची रक्कम वाढऊन देण्याची केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

घरकुलाची रक्कम वाढऊन देण्याची केली मुख्यमंत्र्याकडे म



पत्रकार सेवा संघांचे युवा जिल्हाध्यक्ष मारोती गव्हाळे यांनी केले ऑनलाईन निवेदन सादर

प्रतिनिधी :- संजय जाधव
सद्यस्थितीत यवतमाळ जिल्हातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेचे टार्गेट फार मोठ्या प्रमाणात आले असून, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या घरकुलची रक्कम ही सध्यस्थिती पाहता फारच कमी आहे. ती घरकुलची रक्कम ही तीन लाख पन्नास हजार इतकी वाढऊन द्यावी. अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ युवा जिल्हाध्यक्ष तथा बिरसा क्रांती दल जिल्हाउपाध्यक्ष यवतमाळ मारोती गव्हाळे यांनी केली. याबाबत त्यांनी मा. मुख्यमंत्री साहेब यांना ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.

सद्या महागाई ही फारच मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रत्येक वस्तूचे व जीवनावश्यक वस्तूचे भाव हे गगनाला जाऊन ठेपले आहेत. यां भाववाढीमध्ये सर्वसामान्य जनतेला चटके बसत असून त्यांना हे भाववाढ कधीही न परवडणारी आहे. येथील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वतःच्या हक्काच्या घरात राहता याव. त्यांना सुद्धा राहण्यासाठी एक निवारा मिळावा.


याकरिता भारतसरकार कडून पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना राबविण्यात येत असून,सध्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ लाभार्थीना देण्यात येत आहे. मात्र या योजनेसाठी शासनाकडून मिळणारी निधी, रक्कम अत्यंत कमी असून ती एक लाख विस हजारच आहे. त्या रकमेमध्ये वाढती महागाई लक्ष्यात घेता कुठल्याही प्रकारे घराचे बांधकाम पूर्ण होत नाही.असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये सिमेंट,विटा, वाळू, ढबर,लोखंड गज, मजुरी लेबरची, तसेच मिस्त्रीची मजुरी इत्यादीचे भाव प्रचंड वाढले आहेत. या प्रचंड वाढत्या महागामुळे तो लाभार्थी आपले घर शासनाच्या एवढ्या कमी अनुदानात बांधू शकत नाही. त्यामुळे त्या अनुदानाची रक्कम तीन लाख पन्नास हजार एवढी करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन निवेदनात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ युवा जिल्हाध्यक्ष तथा बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad