निंगनुर येथील आगग्रस्त शेतकरी कुटुंबास उद्देश सोशल फाउंडेशन उमरखेड तर्फे गृह उपयोगी साहित्य व आर्थिक मदत
प्रतिनिधी :- मैनोदिन सौदागर ता.उमरखेड जि.यवतमाळ
निंगनुर येथे दि . 16 एप्रील रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे घर जळून भस्मसात झाल्याने घरात ठेवलेल्या एक लाख रुपये रकमेसह संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य या आगीत जळल्याने शेतकरी कुटूंब उघड्यावर पडले होते.
शेतकरी देविदास सटवा वायकुळे, हे आपल्या शेतातील घरात अनेक वर्षापासून पत्नी संगीताबाई ,मुले आकाश , शंकर , यांच्यासह उन्हाळा पावसाळा हिवाळा ,आपल्या शेतामध्ये राहत होते. शेतामध्येच त्यांचे घर होते. अचानक लागलेल्या आगीच्या तांडवात त्यांचे प्रचंड नुकसान झाले . कष्टाळू शेतकऱ्याच्या आगीत झालेल्या नुकसानामुळे गावात नव्हे तर उमरखेड तालुक्यामध्ये सुद्धा हळहळ व्यक्त होत होती . अचानक लागलेल्या आगीत सुदैवाने जिवीतहानी टळली मात्र आगीचे कारण कळू शकले नाही .
उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक ठाकरे यांना या घटनेची माहिती पिंपळवाडी येथील पत्रकार संजय जाधव भ्रमणध्वनीद्वारे दिली असता उद्देश सोशल फाउंडेशन चे सक्रिय सदस्य अतिश शहाणे ह्यांनी त्यांच्या लग्नवाढदिवसा निमित्त अवांतर खर्च टाळून वायकुळे कुटुंबास गृह उपयोगी साहित्य, किराणा,कपडे मदत म्हणून दिली तसेच उद्देश चे अध्यक्ष दीपक ठाकरे ह्यांनी वायकुळे कुटुंबाचे सांत्वन करून दैनंदिन खर्चा करीता रोख रक्कम दिली व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक ठाकरे, आतिश शहाणे, अनिल महामुने, वैभव कोडगीरवार, पुंजाराम मेंडके , निंगणुर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जयस्वाल ,पत्रकार मैनोदीन सौदागर व निगंनुर येथील अनेक नागरीक उपस्थित होते