प्रतिनिधी निगंनूर. मैनोदिन सौदागर ता.उमरखेड जि.यवतमाळ.
.
निगंनूर ( जाहागीर ). माहे रमजानमध्ये आपल्या गावाच्या व देशाच्या प्रगतीसाठी आणि शांततेसाठी निगंनूर गावातील जामा मशिदीत तीन तरुण युवक आपले घरदार सोडून एतेकाफला बसले आहेत. हे सर्व युवक आपल्या प्रियजनांपासून दूर राहून आपले गाव व देशाच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी अल्लाहच्या पूजेत गढून गेले आहेत यावेळी ते फक्त मशिदीतच राहतात.
एकीकडे देशात हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि बंधुता कायम राहावी यासाठी या पवित्र महिन्यात उपवास करून देवाची आराधना केली जात असताना दुसरीकडे काही लोक अशांततेचा मार्ग अवलंबत आहेत. मात्र निगंनूर येथील जामा मशिदीत एतेेकाफला बसलेले युवक ओसामोदिन मैनोदिन सौदागर .वय २० वर्षे शाहादाबखाँन आगाखाँन वय १७ वर्षे. सिराज आलि काजम आलि नवाब वय २१ वर्षे हे तीन रोजेदार युवक आपले गाव व देशाच्या शांततेला आव्हान देणारे लोकांसाठी अतुलनीय उदाहरण ठरले आहेत.
एतेकाफ करणाऱ्याला गावातून प्रतिसाद मिळत आहे.
निगंनूर जामा मशिदीचे हाफिज ( मौलाना ) सैय्यद कलिम यांनी सांगितले की, जो व्यक्ती अल्लाहला राजी करण्याच्या उद्देशाने रमजानमध्ये मशिदीत एतेकाफ करतो, अल्लाह त्याची पूजा स्वीकारतो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अल्लाह माणसाचे सर्व पाप माफ करतो आणि पुण्य वाढवतो. जो इतिकाफ करतो त्याला दोन हज आणि दोन उमराहचे बक्षीस मिळते.
मुकद्दस रमजानचा तिसरा प्रहर शनिवारपासून सुरू झाला आहे. तिसरा प्रहर नरकापासून मुक्ती देतो. रमजानचा संपूर्ण महिना दयेचा महिना आहे, परंतु सर्वात महत्त्वाचा आहे तिसरा प्रहर. या प्रहरच्या पवित्र रात्रींमध्ये पवित्र कुराण शरीफ रमजानच्या रात्री अवतरला. या रात्रींपैकी ज्या रात्री कुराण शरीफ अवतरला त्या रात्रीला शब-ए-कद्र रात्र असे म्हणतात. त्यामुळे या रात्रीचे महत्त्व खूप वाढते. शब-ए-कद्रची रात्र हजार महिन्यांच्या रात्रींइतकी असते.