Type Here to Get Search Results !

सोलापुर | दौर्यावर असणारे केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब यांचे आज सोलापुर येथे स्वागत करुन विविध रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा

राष्ट्रीय महामार्गांच्या भुमिपुजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सोलापुर दौर्यावर असणारे केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब यांचे आज सोलापुर येथे स्वागत करुन विविध रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा केली.आणि त्या संदर्भात निवेदने सादर केली.



मा.नितीन गडकरी साहेब यांच्याकडे खालील प्रमाणे कांमांसाठी निधीची मागणी केली...

▪️संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कि.मी १०८ ते १३०मध्ये अकलुज बाह्यवळण रस्त्यावर निरा नदीवरील मोठ्या पुलाचा पोहच मार्गामध्ये जुना तांबवे रस्त्याला जोडणारा बोगदा मिळावा.


▪️माळीनगर साखर कारखाना येथे मुख्य गेटसमोर व उस यार्डाच्या समोर असे दोन बोगदे करण्यात यावेत.

▪️ऊस वाहतुक लक्षात घेता महाळुंग येथील बोगद्याची उंची वाढवण्यात यावी.
▪️बोरगाव बाह्यवळण रस्त्यावर दोन बोगद्याला जोडुन वाहतुक सुरळीत होण्यासाठी सर्विस रोड करण्यात यावा.

▪️संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या बोंडले येथे एकत्र येतात त्या चौकात बांधकाम करुन सुशोभिकरण करण्यात यावे.
▪️गट नं२ ते श्रीपुर-बोरगाव (जुन्या) संत तुकाराम महाराज पालखीमार्गाचे दिड मिटरने रुंदीकरण करुन सदर मार्गाचे मजबुतीकरण करण्यात यावे.

▪️अकलुज ते वेळापुर रस्ता CRF मध्ये समाविष्ट करुन ४०कोटी रुपयांचा निधी उपलब्द करुन देण्यात यावा.
▪️करमाळा-माढा तालुक्यातील रोपळे-केम-वडशिवणे-कंदर-कन्हेरगाव MRD12 या रस्त्याचा समावेश CRF मध्ये करुन ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा.

▪️पुणे- हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करण्यात यावा.
▪️संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग यांना जोडणारा अकलुज- वेळापुर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करण्यात यावा.

▪️नातेपुते शहरामधील शिंगणापुर चौक ते मांडवे बायपास काॅर्नरचे मजबुतीकरण करण्यात यावे.
▪️नातेपुते शहरामधील आण्णाभाऊ साठे चौक ते पुर्व बाजुचा नाला येथे बंदिस्त गटार व पेव्हींग ब्लाॅक बसवण्यात यावेत.तसेच शहरामधील डाॅ.मोरे हाॅस्पीटल ते पुर्वबाजुचा नाला येथे बंदिस्त गटार व पेव्हींग ब्लाॅक बसवण्यात यावेत.
▪️नातेपुते शहरामध्ये संत ज्ञानेश्वर पालखीमार्गावर डिव्हायडर बसवुन त्यावर स्ट्रिट लाईट बसवण्यात याव्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News