Type Here to Get Search Results !

मी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आणि माझ्या मतावर आजही ठाम आहे - शरद पवार

मी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आणि माझ्या मतावर आजही ठाम आहे - शरद पवार



 मुंबई :- आज आदरणीय खा . शरद पवार साहेबांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केलेल्या वक्तव्याचा पुरता समाचार घेतला .


 

पवार साहेब म्हणाले की , " बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबतच्या माझ्या विधानाचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला . पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले , असे विधान केले होते . याला माझा सक्त विरोध होता .


 

शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे राजमाता जिजाऊंनी घडवले . त्यामुळे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण मान्य केले पाहिजे . पण पुरंदरेंनी याबाबत वेगळे लिहिण्याचा प्रयत्न केला , तो योग्य नव्हता . हे माझे मत तेव्हाही होते आणि आजही आहे . " दुसरा गंभीर प्रश्न असा की , जेम्स लेन यांनी जे विकृत लेखन केले होते , त्याचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता , अशी माहिती जेम्स लेनने दिली होती .


 

एखादा लेखक जर असे गलिच्छ लिखाण करत असेल व जर ती माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव घेत असेल आणि त्याचा खुलासा पुरंदरे यांनी कधी केला नसेल तर त्याबाबत टीका केली तर दुःख वाटण्याचे कारण नाही . उलट मला याचा अभिमान वाटतो , असे प्रतिपादन पवार साहेबांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News