वसंतनगर पोफाळी येथील अंध , मुकबधीर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसमवेत चौधरी परिवाराने केली वडीलांची पुण्यतिथी साजरी
उमरखेड वडीलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दिव्यांग चिमुकल्यांच्या सहवासात पार पाडावा या हेतूने प्रेरित झालेल्या चौधरी बंधुंनी आपल्या परिवारासह वसंतनगर पोफाळी येथील अंध , मुकबधीर शाळेला भेट देऊन तेथील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन देऊन दि . 31 मार्च रोजी वडील स्वर्गीय ज्योतिबाराव चौधरी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला .
वडील स्वर्गीय ज्योतीबाराव चौधरी यांनी दिलेल्या संस्कारातून शेतीपुरक व्यवसायातून प्रगती साधणारे सर्जेराव पा टील चौधरी , मारोतराव पाटील चौधरी , किसनराव पाटील चौधरी ' बाळासाहेब पाटील चौधरी यांनी गरजवंतांना मदत करा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वडीलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दिव्यांगांच्या सहवासात साजरा करण्याचा निश्चय करून त्यांनी वसंतनगर पोफळी येथील अंध मुकबधीर शाळेत परीवारासह जाऊन पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पाडला .
चौधरी परिवाराने दिलेल्या भोजनाचा चिमुकल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन बी . राठोड , पोफाळीचे पोलीस पाटील , सामाजिक कार्यकर्ते दशरथ मत्ते, अँड. निरंजन पाईकराव , प्रकाश लोमटे दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष अझरउल्ला खान , कार्याध्यक्ष वसंतराव देशमुख , उपाध्यक्ष निळकंठ धोबे ,मनोज जयस्वाल, मनवर सर आदिंची उपस्थिती होती .
शाळेतील प्रशस्त भोजन हॉलमध्ये गं. भा . महानंदाबाई यांनी स्वर्गीय ज्योतिबाराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन चिमुकल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश रत्नपारखे, रवि कबले, रवि दिवेकर . विशाल मोगरकर व शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंदानी अथक परिश्रम घेतले .