Type Here to Get Search Results !

दौलताबाद जलशक्ती अभियानांतर्गत डॉक्टर नर्स अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी घेतली पाणी वाचविण्याची शपथ

दौलताबाद जलशक्ती अभियानांतर्गत डॉक्टर नर्स अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी घेतली पाणी वाचविण्याची शपथ



प्रतिनिधी प्रकाश लकडे



दौलताबाद  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देशभरात सुरु असलेल्या राष्ट्रीय जल अभियानाचे औचीत्य साधून परिसरतील नागरिकांना व प्रा.आ.केंद्रात कार्यरत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना जल शपथ देण्यात आली



 उपस्थितांनी मी पाण्याचा सुयोग्य वापर करीन व पाणी वाचवेल,मी पाण्याच्या प्रतेक थेंबाचा संचय करेल व जलशक्ती अभियानामध्ये मनःपुर्वक सहभागी होईल पाणी ही एक अनमोल संपत्ती आहे असे मानुन मी पाण्याचा वापर करीन,मी आपले कुटुंबिय,मित्र आणि शेजार्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी व पाणी न वाया घालवण्यासाठी प्रेरीत करीन हा आपलाच ग्रह आहे व आपणच त्याला वाचवु शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो अशी शपथ घेतली या प्रसंगी दौलताबादचे ग्रामविकास अधीकारी, केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad